Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»दिवाळी पर्यंत या भागात शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई – पालकमंत्र्यांच्या मागणीनंतर कृषी मंत्र्यांचे निर्देश…
    जळगाव

    दिवाळी पर्यंत या भागात शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई – पालकमंत्र्यांच्या मागणीनंतर कृषी मंत्र्यांचे निर्देश…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 21, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    खरीप हंगामाअंतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत ज्या महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला आहे. अशा जिल्ह्यातील २७ महसूल मंडळातील शेतकरी पीक विम्याच्या निकषात पात्र ठरले आहेत. त्यांना नुकसान भरपाईच्या २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई  दिवाळीपर्यंत देण्याचे आदेश कृषी मंत्री धनजंय मुंडे यांनी मुबंई येथील बैठकित दिले. जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही मागणी केली होती. त्यावर कृषीमंत्र्यांनी तात्काळ आदेश काढले आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री धनजंय मुंडे यांना पत्र देवून मागणी केली होती, यात त्यांनी म्हटले होते कि, पंतप्रधान पिक विमा योजनतेर्गंत ज्या महसूल मंडळामध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला आहे, अशा सुमारे २७ महसूल मंडळातील शेतकरी पिक विमा निकषाप्रमाणे पात्र ठरले आहेत. जिल्हयातील या पात्र महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना विम्याच्या निकषाप्रमाणे २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देय असून ती क्षेत्र पडताळणी करून तात्काळ देण्याबाबत संबधितांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत.

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या या पत्रनुसार कृषी मंत्री धनजंय मुडे यांनी मुबंईत मंत्रालया  बैठक आयोजित केली होती, यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पूर्नवसन मंत्री अनिल पाटील, कृषी सचिव अनुकुमार यादव, व कृषी आयुक्त सुनील चव्हाण , पाणीपुरवठा मंत्र्यांचे खाजगी सचिव अशोक पाटील उपस्थित होते.

    याप्रसंगी  कृषी मंत्री धनजंय मुंडे यांनी तातडीने निर्देश दिले की, राज्य सरकारच्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेच्या माध्यमातून प्रतिकूल हवामान परिस्थितीच्या निकषांमध्ये पात्र झालेल्या २७ महसूल मंडळांतील पात्र शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई विमा निकषाप्रमाणे देय असून, पात्र महसूल मंडळांबाबत तत्काळ अधिसूचना निर्गमित करण्याबाबतच्या सूचना यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. दिवाळीपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.शेतकऱ्यांची दसरा दिवाळी शेतकरी सुखी होवो म्हणून सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

    दरम्यान, याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यांशी प्रत्यक्ष दूरूध्वनीद्वारे आज बोलणे झाले. यापूर्वीच याबाबत जिल्ह्यातील महसूल मंडळांची अधिसूचना काढण्यात आली असून जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई देण्यासाठी कटीबध्द असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

    याप्रसंगी  जिल्हा पीक विमा व शेतकरी समितीचे सी.ए. हितेश आगीवाल व मोहाडी सरपंच धनंजय सोनवणे हेही उपस्थित होते.

    #krishi Dhanajay Munde Guardian Minister N.Gulabrao Patil jalgaon Jilhadhikari Aayush Prasad
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif