Asian Games च्या पहिल्याच सामन्यात शेफालीने रचला इतिहास…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत. क्रिकेटमधील भारत आणि मलेशिया महिला संघ यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या शफाली वर्माने धमाका केला आणि केवळ 31 चेंडूत अर्धशतक झळकावण्यात ती यशस्वी ठरली. शेफालीने 45 चेंडूत 67 धावांची खेळी केली ज्यात ती 4 चौकार आणि 5 षटकार मारण्यात यशस्वी ठरली. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी अर्धशतक झळकावणारी शेफाली पहिली महिला फलंदाज ठरली आणि आंतरराष्ट्रीय T-20 मध्ये 50 षटकार मारणारी सर्वात तरुण फलंदाज बनण्याचा मानही तिला मिळाला आहे.

 

सध्या शेफाली वर्मा अवघ्या 19 वर्षांची आहे आणि ती ज्या स्टाईलमध्ये फलंदाजी करत आहे ती अप्रतिम आहे. शेफालीने क्रीजवर येताच तिने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने 15 षटकात 2 बाद 173 धावा केल्या. या सामन्यात मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.