जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीआधी केळी पीक विमा रक्कम मिळणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

केळी पीक विम्याची प्रलंबित मदत व या वर्षातील खरीप हंगामी पिकविमा अंतर्गत २७ महसूल मंडळातील २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही विमा कंपनीने दिली आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

राज्य शासनाने  पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२२-२३ साठी राज्य हिस्स्याची १९६ कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी मंजुरी देवून निधी वितरित केला होता. यामुळे जिल्ह्यातील रखडलेला पिक विमा नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होवून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा शासनाचा निर्धार आहे.

तसेच जिल्हयातील खरीप हंगामी सन २०२३-२४ पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत ज्या महसूल मंडळामध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला होता, अशा सुमारे २७ महसूल मंडळातील शेतकरी हे पिक विमा निकषाप्रमाणे जिल्हा प्रशासनाने अधिसूचित करून भरपाईसाठी पात्र ठरवले होते. पात्र महसूल मंडळातील विमा धारक शेतक-यांना विम्याच्या निकषाप्रमाणे २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देय असून ती तात्काळ देण्याबाबत कार्यवाही करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे असे निर्देश दिलेले असल्याची माहिती पालकमंत्री श्री.पाटील यांनी दिले आहेत.

राज्याच्या कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे जिल्ह्यासाठी सरसकट लाभ देण्यासाठी सतत पाठपुरावा केला आहे. त्यामुळे सदर नुकसान भरपाई रक्कम ही ४ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. अशी ग्वाही पालकमंत्र्यांना विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी दिले आहे. तापी महामंडळ येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शेतकरी तक्रार निवारण व पीकविमा समितीचे सीए. हितेश आगीवाल व अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.