जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ५५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

0

जळगाव : जिल्ह्यातील दि.२६ रोजी पाचोरा, चाळीसगाव व जामनेर या तालुक्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतीपिकांचे व फळपिकांचे एकूण ५५२.०० हेक्टर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांचे कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे.

जळगाव जिल्हयातील भडगाव, बोदवड, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर व चाळीसगाव या तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीबाबत तहसिलदार भडगाव, बोदवड, चोपडा मुक्ताईनगर, जामनेर व चाळीसगाव यांनी प्राथमिक अहवाल सादर केलेला आहे. भडगाव तालुक्यातील आडळसे गावात प्रतिक्षा गणेश साळुंके या महिला वीजेमुळे जखमी झाल्या असून चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे तसेच सावदे, दलवडे, घुसडीं या गावात गारपीटमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याबाबत भडगाव तहसिलदार यांनी संदेशाद्वारे कळविले आहे.

चोपडा तालुक्यातील सत्रासेन येथील सुभाष संजय पाटील यांचे घराचे अंशतः नुकसान झाले आहे. तर मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बु येथे कापूस व तुर या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच घोडसगाव येथे घरांचे अंशतः नुकसान झाले असून थोडे प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. बोदवड तालुक्यातील मनुर बु. येथे मोसंबी, सिताफळ या फळपिकांचे व निमखेड व शेलवड भागात तूर, कपाशीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. जामनेर तालुक्यातील सामरोद गावात सुनील धनराज पाटील यांच्या मालकीची म्हैस वीज पडून मयत झाली आहे. तसेच अवकाळी पावसामुळे केळी पिकांचे अंदाजे १० ते ११ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव शिवारात निंबा भिकन चव्हाण यांच्या मालकीची २ गाय रात्री पडलेल्या वीज व गारपीटमुळे मयत झाली आहे. तसेच तालुक्यात गारपीटसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. शेतीपिकांचे नुकसानीसह आडळसे गावात प्रतिक्षा गणेश साळुंके या महिला वीजेमुळे जखमी झाल्या असून चाळीसगाव येथे खाजगी मोठे रुग्णालयात उपचार सुरु आहे. दुधाळ जनावरे, ओढकाम करणार जनावरे, काही अंशतः घरांची पडझड झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.