हवामान खात्याचा उष्णतेच्या लाटेचा इशारा !

0

नवी दिल्ली : – हवामान खात्याने बिहार, झारखंड, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि बंगालमध्ये 5 दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा, बंगाल आणि तेलंगणामधील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंश ते 44 अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले.गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा आणि दिल्लीमध्ये तापमान 40 ते 42 अंशांच्या दरम्यान आहे. आंध्र प्रदेशातील नंदयाल येथे सर्वाधिक तापमान 44.6 अंश नोंदवले गेले.

पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर कोकणात उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला. राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमानाचा पारा पुन्हा चाळिशीपार गेला आहे. मराठवाड्यापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान होत असून, पावसाला काही प्रमाणात अनुकूल हवामान कायम आहे. राज्यात सध्या काही भागांत ढगाळ हवामान आहे, तर काही भागांत आकाश निरभ्र होऊ लागल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही शहरांचे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे ढगाळ हवामानाबरोबर उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. हवामान विभागाने २८ ते २९ एप्रिलदरम्यान कोकणातील काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला,

पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात रविवारी मुसळधार पाऊस पडेल. तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, गोवा, आसाम, मेघालय, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, ओडिशा आणि पश्चिमेकडे उष्णतेची लाट कायम राहील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.