जळगाव बस स्थानकात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला

0

जळगाव : शहरातील नवीन बस स्थानक परिसरात एका ४० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळच्या सुमारास आढळून आला. त्याला रुग्णवाहिकेतून तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषीत केले.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताने चॉकलेटी रंगाचे टी शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. तरी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन तपासधिकारी पोलीस हेड कॉन्सटेबल महेंद माळी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.