विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा

0

जळगाव :– विवाहितेची जुन्या वादाच्या कारणावरुन चूलत नणंद व दीराने विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास अयोध्या नगर परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अयोध्या नगरा येथे सविता गोपाल पाटील या विवाहिता राहतात.

शनिवारी दुपारच्या सुमारास त्याच परिसरात राहत असलेले त्यांच्या सासू सासऱ्यांकडे आल्या होत्या. यावेळी पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून विवाहितेची चूलत नणंद ज्योती पाटील, त्यांचा पती व चुलत दीर नागेश्वर पाटील यांनी विवाहितेचा शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच त्यांना गेटपर्यंत ओढत नेले. त्यानंतर विवाहितेने तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन संशयित ज्योती पाटील, त्यांचे पती व दीर नागेश्वर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.