‘माझा फोन ब्लॉक का केला’? म्हणत प्रियेसीच्या घरात घुसून राडा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रियसीने अचानक प्रेमसंबंध अचानक तोडले. त्यामुळे प्रियकराला याचा राग अनावर झाला. याचा राग आल्याने त्याने थेट प्रेयसीचा घर गाठलं. ‘तू माझ्याशी का बोलत नाहीस, माझा फोन का उचलत नाहीस’, असं म्हणत त्याने मध्यरात्री प्रियेसीचा घरात घुसून राडा घातला. इतकंच नाही तर, सोशल मीडियावर फोटो व्हायरल धमकी देखील दिली आहे.

ही धक्कादायक घटना यवतमाळ वणी पोलीस ठाणे परिसरात घडली. याप्रकरणी विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही विवाहित असून तिला दोन मुली आहे. आपल्या पतीसोबत पटत नसल्याने तक्रारदार महिला ६ वर्षांपासून विभक्त राहत होती. यादरम्यान, महिलेचे चिखलगाव येथील एका व्यक्तीसोबत (वय ४०) प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही एकमेकांना भेटत होते. मात्र, अलीकडे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याने प्रेयसी प्रियकराला टाळू लागली. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने महिलेचं घर गाठले आणि राडा केला.

इतकेच नाही तर, तुझे फोटो शोषलं मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी सुद्धा दिली. या घटनेनंतर महिलेने तातडीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, असे सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.