केळी खोडावर प्रक्रिया करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेचे अर्थसहाय्य – संजय पवार

0

जळगाव : जिल्ह्यात ५५ हजार हेक्टर केळीचे क्षेत्र असून सध्या फेकून दिल्या जाणाऱ्या केळी खोडावर प्रक्रिया करून शेतकरी उत्पन्नात भर टाकू शकतो. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसह शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागणार असल्याने अशा प्रक्रिया उद्योगांसाठी शेतकऱ्यांनाच अर्थसहाय्य करण्याची घोषणा जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी जिल्हा बँकेच्या १०७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.

उपाध्यक्ष अमोल पाटील, आमदार चिमणराव पाटील, माजी आमदार डॉ. सतीश पाटील, ॲड. रविंद्र पाटील, प्रदीप देशमुख, शैलजा निकम, रोहित निकम, विनोद पाटील, जयश्री महाजन, कुलभूषण पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

री. पवार म्हणाले की, जिल्हा बँकेच्या ठेवींमध्ये वाढ झाली आहे. मार्च २०१३ अखेर ३ हजार ४९६ कोटींच्या ठेवी आहेत. बँकेने पाच लाखापर्यंत ठेवीदारांचा विमा उतरविला आहे. गेल्या पाच वर्षात बँकेने स्वभांडवलातून संपूर्ण कर्जवाटप केलेले आहे.

बँकेच्या भांडवलात वाढ झालेली असून, एकूण भांडवल १९५.५५ कोटी आहे. आज अखेर बँकेने एक लाख ७९ हजार ७८२ शेतकऱ्यांना ८८० कोटींचे पीक कर्ज वाटप केले आहे. बँकेचा एनपीए ४१.१४ टक्के झालेला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.