नायपरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत अंकिता यावलकरची भरारी

0

हैद्राबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नायपर हैद्राबादद्वारे  ‘न्यू होरायझन्स इन ड्रग्ज, डिव्हाईस अँड डायग्नोस्टिक्स’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे हैद्राबाद येथे 14 ते 16 सप्टेंबर 2023 रोजी आयोजन कऱण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अंकित यावलकर हिने सहभाग घेत सर्वोत्कृष्ट ओरल प्रेझेन्टेशन स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवले.

मूळ सावदा येथील सध्या गुजराथ मधील गांधीनगर येथे वास्तव्यास असलेले चितोडे वाणी समाजाचे ज्येष्ठ बांधव नितीन यावलकर यांची कन्या अंकिता हिचे राष्ट्रीय स्तरावरील यशा बद्दल समाजासह सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

‘न्यू होरायझन्स इन ड्रग्ज, डिव्हाईस अँड डायग्नोस्टिक्स’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत वक्त्यांच्या व्याख्यानांचा समावेश होता. तसेच परिषदेचा एक भाग म्हणून तोंडी सादरीकरण आणि पोस्टर सादरीकरण करण्यात आले. या परिषदेला भारतातील 27 राज्यांचा सहभाग मिळाला असून या कार्यक्रमासाठी 500 हून अधिक लोकांनी नोंदणी केली होती. या तोंडी आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धेला मिळून 400 हून अधिक प्रवेशिका मिळाल्या, ज्यामधून निवडलेल्या उमेदवारांना प्रतिनिधींसमोर सादर करण्याची परवानगी देण्यात आली. ‘फॉर्म्युलेशन ऑफ प्रIमीपेक्सोल डायहाइड्रोक्लोराइड लोडेड बायोडिग्रेडेबल मायक्रोस्फेअर्स: इन-सिलिको आणि इन-विट्रो स्टडीज’ या विषयावर अंकिताने मौखिक सादरीकरण केले. यात तब्बल ६२ जणांनी भाग घेतला होता. यामधून सर्वोत्तम मौखिक सादरीकरणांपैकी एक म्हणून अंकिताचे सादरीकरण निवडले गेले. तर दुसरे पारितोषिक NMIMS, हैदराबाद येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. मुक्ता अग्रवाल यांनी जिंकले.

अंकिता यावलकर हिने गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीशी संलग्न असलेल्या एल. एम कॉलेज ऑफ फार्मसी (अहमदाबाद) मधून बॅचलर ऑफ फार्मसी (B. Pharm) पूर्ण केले. नंतर, GPAT प्रवेश परीक्षेद्वारे (AIR 1) इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (मुंबई) येथे ‘मास्टर ऑफ फार्मसी (M.Pharm) (फार्मास्युटिक्स)’ साठी प्रवेश मिळवला. सध्या ती इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई येथे फार्मास्युटिक्समध्ये पीएचडी’ टेक. (Ph.D. Tech) (फार्मास्युटिक्स) करत असून तिच्या संशोधन क्षेत्रांमध्ये नियंत्रित रिलीझ डोस फॉर्म (controlled release dosage form) आणि वेसिक्युलर सिस्टमचा विकास समाविष्ट आहे. अंकिताचे प्रबंध कार्य प्रामुख्याने स्वयंप्रतिकार विकारांसाठी (autoimmune disorders) औषध वितरण प्रणालीच्या विकासावर केंद्रित आहे. अधिक विशिष्‍टपणे इन-सिलिको कंप्युटेशनल (सॉफ्टवेअर आधारित) पध्दती वापरून परवडणारे आणि स्केलेबल वेसिक्युलर आणि नियंत्रित रिलीझ डोस फॉर्म विकसित करण्याच्या क्षेत्रात ती काम करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.