मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु पण, ‘या’ राज्यात पावसाचा जोर कायम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या बऱ्याच दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसाने मुंबई आणि नवी मुंबई भागात काहीसा दिलासा दिला होता. कोकण आणि विदर्भाला मात्र पावसाने चांगलेच झोडपले. पाऊस एवढा होता की, झालेल्या पावसामुले नागरिकांच्या घरात पाणी साचलले होते. पावसाचा आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. असं जरी सांगण्यात आले असले तरी, पाऊस कोकणातून लवकर काढता पाय घेणार नसल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या २४ तासांमध्ये रत्नागिरी जिल्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. यामुळे संपूर्ण जिंजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, मुंबई-गोआ महामार्गावर पाणी साचल्याने तेथील वाहतूक संथ झाल्याचे चित्र डोळ्यासममोर होते. पाववसाची राज्यातील एकूण स्थिती पाहता २९ सप्टेंबर पर्यंत पाऊस कायम राहणार असून धीम्या गतीनं त्याचा जोर कमी होतांना दिसणार आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. तर, नाशिक, संभाजीनगरमध्येही पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले होते. येत्या २४ तासांमध्ये नांदेड, लातूरलाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सूनच्या परतीचा प्रवास
मंगळवारपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार असून, याची सुरुवात उत्तर भारतापासून होणार आहे. राजस्थानच्या काही भागांतून नैऋत्य मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे. महाराष्ट्रात मान्सून उशिरानं सक्रिय झाल्यामुळे त्याच्या परतीचा प्रवासही उशिरानं म्हणजेच 10 ऑक्टोबरनंतर सुरु होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. राज्यात सध्या मान्सूनचाच पाऊस सुरु असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. देशाच्या उत्तरेकदिल भागात आतापासूनच हवामान बदलण्यास सुरुवात झाली असून, थंडीची हलकी चाहूलही मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.