ई पिक पाहणीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ

0

यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

ई पिक पाहणी या मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना शेतातील पिक पेरा नोंदवायचा आहे. परंतु या ॲपमध्ये शेतकऱ्यांना बऱ्याच अडीअडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सन 2023 24 या वर्षात खूपच कमी शेतकऱ्यांनी पिक पेरा नोंदविला होता. या सर्व बाबींचा विचार करता जमाबंदी आयुक्त आणि संचालक एम के सुधांशू यांनी पिक पेरा नोंदविण्याची १० दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

त्यामुळे  शेतकरी आता २५ सप्टेंबर पर्यंत पिक पेरा नोंदवू शकता. याचा फायदा असंख्य शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही शेतातील पीक पेरा नोंदविला नाही त्यांनी तात्काळ पीक पेरा नोंदवून घ्यायचा आहे. पिक पेरा नोंदविला नसल्यास पिक विमा शेती पिकाचे नुकसान दुष्काळ तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होतील असे महसूल विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.