नशिराबाद येथे ट्रकचालकास लुटून आरोपी फरार, २ जणांवर गुन्हा दाखल

0

नशिराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क

नशिराबाद तोल नाक्याजवळ मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ट्रकचा पाठलाग करत दुचाकीस्वारांनी अडविले. टोल नका परिसरात ट्रक थांबवून दमदाटी करत चालकाच्या खिशातून २ हजार रोख आणि गुगल-पे ने १९ हजार असे एकूण २१ हजार रुपये हिसकावून पळ काढल्याची घटना घडली आहे. नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशिराबाद पोलिसांत दाखल तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे, देवेंद्र कुमार रामद्रश पटेल (वय ३८, रा. छत्रगड, जि.रेवा, मध्यप्रदेश) हा ट्रक चालक असून शनिवारी (ता.२५) देवेंद्र कुमार हा त्याच्या ताब्यातील १४ चाकी ट्रक (क्र. युपी ६३ टी ९७१८) ने जळगावकडून नागपूर येथे जाण्यासाठी निघाला होता.

नशिराबाद टोल नाक्याजवळून जात असतांना मागून पाठलाग करत येणाऱ्या दुचाकीस्वारांनी ट्रकचा रस्ता अडविला आणि चालक देवेंद्रकुमार याला ट्रकखाली ओढून त्याला दमदाटी करत खिशातील व ऑनलाईन अशी रक्कम देण्यास भाग पाडले.

तसेच एकाने ट्रकचालकाच्या गुगल पे वरून १९ हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर दोघे पसार झाले. ही घटना घडल्यानंतर ट्रकचालक याने पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात २ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.