नाशिकमध्ये सराईत गुहनगराकडे आढळल्या ड्रग्सच्या पुड्या

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

नाशिकच्या सिडको भागातील गुन्हेगारी थोड्या प्रमाणात कमी झाली असले तरी, काही सराईत गुन्हेगारांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यात एका सराईत गुन्हेगाराने सोशल मीडियावर स्वतःच्या हातात एमडीची पुडी असल्याचे दोन व्हिडिओ व्हायरल केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. अंबड पोलिसांच्या नाकावर टिचून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न याठिकाणी केल्याचे समोर येत आहे.

नाशिकच्या एमडी ड्रग्स प्रकरणाची संपूर्ण राज्यभरात चर्चा झाली. यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील झाले. पोलिसांनी एमडी ड्रग्सचा पर्दाफाश केला. मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एमडी ड्रग्स व्हिडिओमुळे एमडी ड्रग्सची मुळे किती खोल पसरली आहे. याची जाणीव होते. १० वर्षांपूर्वी सिडकोतील टिप्पर गँगने मोठी दहशत निर्माण केली होती. त्या गँगच्या सदस्यांवर २५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे. यांना अद्दल घडवण्यासाठी तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी कंबर कसत यांच्यावर दोनदा मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर सिडकोतील गुन्हेगारी कमी झाली. त्यानंतरही आलेल्या वरिष्ठ निरीक्षकांनी योग्य नियोजन करीत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविले.

आता पुन्हा यांच्याशी संबधीत गुन्हेगारांनी पुन्हा एकदा आपले बस्तान बसविण्यास सुरवात केली. दोन दिवसांपूर्वी एका गुन्हेगाराने हातात असलेली एमडीची पुडी आणि तो कारमध्ये बसून गाणे ऐकत असल्याचा व्हिडिओ, तर एका व्हिडिओत त्याच्यासमोर एमडीच्या पुड्या आहेत; असा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.