निंभोरा बलवाड़ी रेल्वे गेट दोन महिन्यांसाठी बंद

0

 

खिर्डी (रावेर), लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

रावेर मार्गे वाहतूक करणार्यांसाठी एक महत्वाची सूचना आज जारी करण्यात आली आहे. रावेर तालुक्यातील निंभोरा येथील रेल्वे गेट फाटक क्रमांक 167/3-E हे दिनांक १० एप्रील २०२४ पासून ते ३० जून २०२४ पर्यंत बंद राहणार आहे.

याबाबत अधिकृत असे की, या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून भुयारी मार्ग करण्यासाठी रेल्वे गेट क्रमांक 167 हे जिल्हाधिकारी जळगाव यांच्या परवानगीने भुयारी (सबवे) करण्यासाठी सुमारे दोन महिन्यापर्यंत बंद होणार असल्याने परिसरातील शेतकरी व इतर वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. कारण या साठी पर्यायी मार्ग तब्बल ६ कि.मी.चा वळसा घालून खिर्डीमार्गे, तसेच शिंगनुर भुयारी मार्गे बलवाडी जावे लागणार आहे. या संदर्भातले सूचना पत्र ग्रामपंचायत निंभोरा, पोलीस स्टेशन, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व संबंधित विभागाला दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.