दुर्देवी: ईदच्या दिवशी युवकाचा धरणात बुडून मृत्यू

0

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज ईदच्या दिवशी सावदा येथे दुःखद घडली आहे. इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेला सावदा येथील ख्वाजानगर परिसरातील शे. ताबिश शे. रमजान मोमीन (वय १५) याचा मृत्यू झाला.

शेख ताबिश शेख रमजान मोमीन हा आपल्या चार ते पाच मित्रांसोबत सकाळच्या ईदगाहवरील सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर गारबर्डी धरणावर फिरायला गेला. यावेळी पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. याच्या पश्चात एक मोठा आणि एक लहान भाऊ आहेत. ऐन ईदच्या दिवशी घरातील एक जवान मुलगा गेल्याने त्याच्या परिवारावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अचानक जाण्याने ख्वाजानगर भागात एकच शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.