जळगाव, रावेर लोकसभा भाजप उमेदवारी बाबत संभ्रम

0

जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर दोन्ही लोकसभा मतदारसंघात गेल्या चार टर्मपासून भाजपचे उमेदवार विजयी होतात म्हणून जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. जळगाव लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये भाजपचे उन्मेष पाटील हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. तसेच २०१९ मध्ये रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या खासदार रक्षा खडसे या दुसऱ्यांदा प्रचंड मताधिक्यांनी निवडून आल्या. तरीसुद्धा जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार उन्मेष पाटील आणि रक्षा खडसे यंदाच्या २०२४ लोकसभा निवडणुकीची उमेदवारी बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना हमखास उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. कारण २०१९ मध्ये माजी आमदार स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून अधिकृतपणे जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळी रद्द करून चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे स्मिता वाघ या प्रचंड नाराज झाल्या होत्या. त्यामुळे अधिकृत उमेदवारी घोषित झालेल्या माजी आमदार स्मिता वाघ मतदार संघात प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात झाली आहे. खासदार उन्मेश पाटलांचा विक्रमी मताधिक्क्यांनी विजय झाला. परंतु त्यांचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेला देण्यात आले. त्याचप्रमाणे रावेर लोकसभा मतदारसंघातून खासदार रक्षा खडसे २०१४ आणि २०१९ ला प्रचंड मताधिक्यांनी निवडून आल्या असल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेलाच त्याचे श्रेय देण्यात आले. खासदार रक्षा खडसे यांचे सासरे माजी मंत्री राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे हे २०१९ ला भाजपात होते. आता ते राष्ट्रवादी पक्षात असल्याने खासदार रक्षा खडसे यांना भाजप तर्फे उमेदवारी दिली जाणार नाही. त्यांचा २०२४ च्या निवडणुकीत पत्ता कापला जाणार, अशा प्रकारची चर्चा गेल्या अनेक महिन्यापासून होत आहे. त्यातच एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपात यावे असे वक्तव्य खासदार रक्षा खडसेंनी केले खरे, परंतु वरिष्ठ भाजप नेत्यांच्या दमदाट्या येतात त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत घुमजाव केले. त्यामुळे रक्षा खडसेंच्या वक्तव्याला भाजपात विशेष किंमत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पक्षांना २०२४१ उमेदवारी मिळेल की नाही याबाबतही उलट सुलट चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झाली नाही. त्या मागचे कारण असे सांगण्यात येते की, विरोधी पक्षा कोणाला उमेदवारी मिळते त्यावर भाजप आपला उमेदवार जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. रावेर मधून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांची रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली असल्याचे कळते. जर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथराव खडसे हे विरोधी पक्षाचे उमेदवार असतील तर रक्षा खडसे यांचा पत्ता भाजप तर्फे कापला जाईल, असे सांगण्यात येते. त्यामुळे जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाईल असे बोलण्यात येते आहे. परिणामी जिल्ह्यात भाजपचे दोन्ही विद्यमान खासदार यांच्या उमेदवारी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

नुकतेच भाजपचे निरीक्षक म्हणून आमदार दरेकर हे जळगावला येऊन गेले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यात विद्यमान खासदारांची उमेदवारी बदलली पाहिजे का? बदलायची कारणे काय? याबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्याचे कळते. परंतु हा निवडणूक प्रक्रियेचा एक भाग असतो असे सांगून उमेदवार बदली बाबत स्पष्ट मत व्यक्त करणे त्यानी टाळले. त्यामुळे खुद्द भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झाला आहे. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपचे अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. इच्छुकांची यादी फार मोठी आहे. निष्ठावान भाजपकर्त्यांच्या नावात जळगाव मधून दिलीप रामू पाटील, स्मिता वाघ, अविनाश जाधव, रोहित निकम हे इच्छुक आहेत. तर रावेरमधून माजी खासदार कै. हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे, नुकत्याच काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या डॉक्टर केतकी पाटील, उद्योगपती श्रीराम पाटील हे इच्छुक आहेत. त्यामुळे जळगाव आणि रावेर मधून कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यंदा भाजपने ‘आपकी बार ४०० के पार’ हा नवा नारा दिला असल्याने ‘निवडून येणारा उमेदवारच’ भाजप तर्फे घोषित करण्यात येईल असे सांगण्यात येते. जळगाव जिल्ह्यातील भाजपचे दोन्ही उमेदवार कोण असतील यांची नावे ग्रामविकास मंत्री गिरीश महा,जन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निश्चित केल्याचे कळते. परंतु विरोधी पक्षाचे उमेदवार कोण असतील, त्यानंतर ही नावे भाजप तर्फे जाहीर केली जाणार असल्याचे बोलले जात आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.