गोळीबारप्रकरणी चार जणांना अटक ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

0

जळगाव : – जुन्या वादातून मेहरुण परीसरातून सोहम गोपाळ ठाकरे या तरुणावर भर दिवसा गोळीबार झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी एमआयडीसी हद्दीत भरदिवसा घडली होती. पोलिसांनी चौघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. संशयित दीक्षांत उर्फ दादू देविदास सपकाळे याने सोहम गोपाळ ठाकरे या तरुणावर जुन्या वादातून गोळी झाडल्यानंतर तो सहकार्‍यासह धुळे येथे नातेवाईकांकडे लपला असताना पोलिसांनी त्यास अटक केली. अन्य दोघा संशयितांची ओळख परेड बाकी असल्याने पोलिसांनी त्यांची नावे जाहीर केली नाही.

1 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोहम हा मित्रासोबत श्रीराम कन्या शाळेजवळ उभा असताना दोन दुचाकींवर चौघे त्याठिकाणी आले. गोपाळने त्याच्या कंबरेला खोचलेली पिस्तूल दीक्षांत यांच्या हातात दिल्यानंतर दीक्षांतने सोहमवर गोळीबार करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला मात्र दीक्षांत पसार झाल्याने त्याला ईजा झाली नाही तर गोळीबारानंतरही संशयितदेखील पसार झाले. चौघा संशयितांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हल्लेखोर दीक्षांत सपकाळे हा साथीदारांसह धुळे येथील देवपूर परिसरात त्याच्या नातेवाईकांकडे असल्याची एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाल्यानतंर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, किरण पाटील, सचिन मुंढे, किशोर पाटील, छगन तायडे, गणेश शिरसाळे, ललित नारखेडे आदींनी दीक्षांतसह चौघांना अटक केली. गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित दीक्षांत याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी व इतर आठ गंभीर तर गोपाल चौधरी याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.