मोदींच्या फोटोवरुन तू-तू मै-मै !

नणंद-भावजयीत सोशल मीडिया वॉर

0

 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

रावेर लोकसभा मतदारसंघात सध्या नणंद-भावजयमध्ये सोशल मीडिया वॉर सुरु असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवरुन सध्या रावेरमध्ये रक्षा खडसे आणि ॲड. रोहिणी खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा फैरी सुरु झाल्या आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघात नणंद व भावजयमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू असल्याचे दिसून येत आहे. खतांच्या बॅगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असल्याने त्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, असे राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या ॲड. रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. तर याला उत्तर देत खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, जनतेच्या मनातून मोदी कसे काय पुसून टाकणार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले खतांची बॅग वाटप करत असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करत म्हटले की, खतांच्या बॅगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या बॅग दिल्या जात आहे. तर आता निवडणूक आयोगाने कारवाई करावी, असे म्हटले आहे.

खासदार रक्षा खडसे यांनी ॲड. रोहिणी खडसे यांनी शेअर केलेला पोस्टला उत्तर देताना म्हटले आहे की, तुम्ही नरेंद्र मोदींना भिंतीवरून पुसू शकाल, मोदींचा फोटो खतांच्या बॅगवरून काढून टाकाल. मात्र, जनतेच्या मनात असलेले मोदी कोणी पुसू शकणार नाही. त्यामुळे नणंद-भावजय यांचे सोशल मीडिया वॉर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.