पोलीस खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष ; १४ लाखांची फसवणूक

0

भुसावळ :- पोलीस खात्यात नोकरी लावून देतो, असे सांगून द्वारका नगरातील दोन जणांकडून १४ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील द्वारका नगरमधील विजय नारायण सोनवणे (वय ३५) यांच्यासह त्यांच्या भावास याच परिसरात राहणारा आकाश प्रकाश भालेराव यांना पोलीस खात्यात नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवले. त्यानंतर राघवेंद्र महादेव पाटील, गौरी राघवेंद्र पाटील (दोन्ही रा. मुंबई) आणि अनिल सपकाळ (रा. कल्याण) या तीन जणांनी या दोघांकडून १४ जून २०२२ रोजी १४ लाख रूपये घेवून फसवणूक केली.

तर दोघांना नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर विजय सोनवणे यांनी २१ मार्च रोजी रात्री ८ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात राघवेंद्र महादेव पाटील, गौरी राघवेंद्र पाटील आणि अनिल सपकाळ या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि नीलेश गायकवाड करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.