स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला धोका?

गुजरात, दिल्लीच्या टीमचा सर्वे विरोधात : ए. टी. पाटील यांची बाजू सकारात्मक

0

जळगाव ;- स्मिता वाघ यांना भाजपने जाहीर केलेले जळगाव लोकसभा मतदारसंघातील तिकीट कापले जाणार असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून त्यांच्या जागी माजी खासदार ए.टी. पाटील यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याची दाट शक्यता आहे. नुकतीच दिली व गुजरात येथील एक टीम मतदारसंघात येवून गेल,ी असून त्यांनी केलेला सर्वे स्मिता वाघ यांच्या विरोधात असून ए.टी. पाटील यांच्याबद्दल सकारात्मक दिसत आहे.

 

गुजरात टीममध्ये तब्बल पंधरा महिलांचा समावेश होता. तिकिट कापल्यामुळे नाराज झालेले भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला. इतकेच नव्हे तर पारोळ्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांना सोबत घेत त्यांना भाजपच्या स्मिता वाघ यांच्यासमोर उमेदवार म्हणून आव्हान उभे केले. या अनेपक्षित धक्क्यामुळे भाजपने पुन्हा स्मिता वाघांना पर्याय म्हणून माजी खासदार ए. टी. पाटील यांच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे.

माजी खासदार ए. टी. पाटील यांनी भाजपश्रेष्ठींची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले असून गेल्या दोन दिवसांपासून ए.टी. पाटील जिल्ह्याच्या बाहेर आहेत. त्या निमित्ताने भाजप पुन्हा एकदा भाकरी फिरवण्याची चर्चा रंगली आहे. तसे झाल्यास सलग दुसऱ्या टर्मला जळगावात भाजपवर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावणार आहे

. मध्यंतरी ए.टी. पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. मागील काही दिवसांत ए. टी. पाटील यांनी दिल्लीत भाजपश्रेष्ठींची भेट घेतल्याने राजकीय गोटात चर्चा सुरू झाल्या आहेत. पाटील यांच्याऐवजी त्यांचा मुलगा ॲड. रोहित पाटील यांच्याही नावाचा विचार होवू शकतो.

टीमचा सर्वे गेला विरोधात?
स्मिता वाघ यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर पक्षात नाराजी असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर दिल्ली व गुजरात येथील टीमने पुन्हा सर्वे केला असून यात महिलांची संख्या अधिक होती. हा सर्वे स्मिता वाघ यांच्या विरोधात तर ए.टी. पाटील यांच्या बाजूने सकारात्मक आहे.

मी बाहेरगावी….
दरम्यान, माजी खासदार ए.टी. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आपण बाहेरगावी असून याबाबत काही माहिती नाही. पक्ष घेर्इल तो निर्णय आपणास मान्य आहे. सकारात्मक निर्णय होर्इल काय? हे सांगणे आताच संयुक्तीक ठरणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.