जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

जळगाव : – शहरातील जोशींपेठ परिसरात एका सुवर्ण कारागिराने गळफास घेतल्याची धक्कदायक घटना गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. मलाई जगई चक्रवर्ती (वय ३१ रा. पतंग गल्ली, जोशीपेठ जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे.

शहरातील पतंग गल्लीत मलाई जगई चक्रवर्ती हा तरुण आपल्या आई-वडील पत्नी आणि सहा महिन्याच्या मुलासोबत वास्तव्याला होता. वडीलांसोबत सोन्याचे दागिने बनवण्याचे काम करून तो कुटुंबाला हातभार लावित होता. दरम्यान, गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूममध्ये त्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला खाली उतरवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.