अहिरवाडी येथे २० किलो डिंक जप्त ; वनविभागाची कारवाई

0

रावेरः तालुक्यातील सातपुड्या लगत असलेल्या अहिरवाडी वनक्षेत्रातील अवैधरित्या सलई डिंक वाहतूक करीत असतांना एक मोटर सायकल स्वार आल्याची गुप्त माहिती वनक्षेत्र अधिकारी यांना मिळाली त्यांनी लागलीच कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना माहीती देताच त्यांनी त्या डिंग चोराला पकडण्याचा प्रयत्न केला परंतू आरोपीने अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार झाला आहे. २० किलो डिंकसह एक वाहन वन विभागाने जप्त केले आहे.

प्रादेशीक रावेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावने यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार रावेर वनक्षेत्रातील परिमंड अहिरवाडी मधील नियतक्षेत्र पडल्या मधील कं. नं. ०३ मध्ये गस्त करीत असताना एक मोटार सायकल एम.पी १२ बीए ७२०२ सी. साधारण वीस किलो सलई डिंक जप्त केला असूनआरोपी सलई डिंक व मोटार सायकल फेकून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. आरोपीचा पाठलाग केला असता आरोपी मिळून आला नाही,

कार्यवाही ही अजय नारायण बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर, वनरक्षक सुपडू सपकाळे, वनरक्षक रमेश भुतेकर यांचा सहभाग होता. सदरची कार्यवाही ही उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.