१७ लाखांचे सोने घेवून पसार झालेला बंगाली कारागिर जेरबंद

0

जळगाव :- शहरातील सराफ व्यापाऱ्यांचे १७ लाख रुपये किंमतीचे सोने घेवून पसार झालेल्या शेख अमीरुल हुसेन या बंगाली कारागिराला तूमसर रोड येथून धावत्या रेल्वेतून नागपूर रेल्वे सुरक्षा बलासह शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५६ ग्रॅमपैकी ९७.८८० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे.
शहरातील लक्ष्मी नगरात वास्तव्यास असलेले सोन्याचे व्यापारी शुभम प्रदीप वर्मा (वय ३०) यांनी सोने कारागिर शेख अमीरुल हुसेन (वय २८, रा. पश्चिम बंगाल, ह.मु. जोशी पेठ, जळगाव) याला १५ लाख रुपये किंमतीचे २२५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड दिली होती. या सोन्यासह खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा (रा. जळगाव) यांची दोन लाख रुपये किंमतीची ३१ ग्रॅम वजनाची चैन असे एकूण १७ लाख रुपये किमतीचे २५६ ग्रॅम वजनाचे सोने घेऊन कारागिर शेख अमीरुल हुसेन हा पसार झाला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही माहिती शनिपेठ पोलिसांनी ठिकठिकाणच्या पोलिसांना तसेच रेल्वे सुरक्षा बलाला दिली होती.

शेख अमीरुल हुसेन हा हा मुंबई-हावडा मेलने पश्चिम बंगाल येथे जात होता. ही रेल्वे तुमसर रोड स्थानकावर पोहचताच कोच नंबर एकमध्ये बसलेल्या अमीरूल शेख याला आरपीएफच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याला शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोउनि चंद्रकांत धनके, पोकॉ रवी तायडे यांच्या ताब्यात दिले.

संशयीत शेख अमीर याच्या जवळ असलेल्या बॅगमध्ये ९७.८८० ग्रॅम सोने सापडले. त्याची किंमत सहा लाख ४५ हजार रुपये असून ते सोने जप्त करण्यात आले आहे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.