श्री अंबिका व्यायाम शाळेतर्फे श्रीराम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त स्वच्छता मोहीम….

0

 

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये श्री राम लल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याच्या अनुषंगाने रावेर येथील श्री अंबिका व्यायाम शाळा यांचे तर्फे आज दि. 20 जानेवारी रोजी सायंकाळी 5:00 वाजत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये अंबिका व्यायाम शाळेचा परिसर ते बऱ्हाणपूर रोडपर्यंतचा परिसर स्वच्छ करण्यात आला.

अंबिका व्यायाम शाळेतील प्रतिनिधींनी ठिकठिकाणी पाणी शिंपडून स्वच्छता केली. यावेळी रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेचे चौकामध्ये अनावरण करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन तसेच अंबिका व्यायाम शाळेचे संचालक भास्कर महाजन, भगवान महाजन, एकनाथ महाजन, वरून अग्रवाल, अशोक पाटील, पंडित बारी व असंख्य अनेक लोक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.