रावेर येथे खाजगी बस अचानक जळून खाक;

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

सध्या दिवाळीच्या सुती नंतर घरी आलेली मंडळी कामावर हजर होण्यासाठी परतीचा प्रवास करत आहे. त्यामुळे बस, ट्रेन यासह खाजगी बस या अगदी तुडुंब आहेत. मात्र यामध्येच जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे रावेरहून पुण्याकडे जाणाऱ्या साई सिद्धी ट्रॅव्हल्सच्या बसने अचानक पेट घेतल्याची घटना आज सायंकाळी साडे सात च्या सुमारास रावेर- सावदा (ता. रावेर) रस्त्यावर घडली आहे. त्यात बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने प्रवास करणारे २० प्रवासी सुरक्षित आहेत.

बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच जीव वाचवण्यासाठी प्रवासी पटापट खाली उतरले. काहीजणांचे साहित्य बसमध्ये राहिल्याने ते आगीत खाक झाले. त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. खासगी बस (क्र. एमएच ४० एन ५३६१) रावेरहून सायंकाळी ७ वाजता २० प्रवाशांना घेऊन पुण्याकडे निघाली. वाटेत वडगाव-वाघोदा (ता. रावेर) दरम्यान सुकी नदीच्या पुलाजवळ बसचे टायर फुटले. त्यामुळे बसने अचानक पेट घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सावदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सपोनि जालिंदर पळे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.