धावत्या रेल्वेतून पडून प्रवाशाचा मृत्यू

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा रेल्वे स्थानका जवळ धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या मध्यप्रदेश राज्यातील ३८ वर्षीय इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानका जवळ रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७१/२५ जवळ डाऊन ट्रॅकवर एक इसम जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस काॅन्स्टेबल मधुसूदन भावसार यांना मिळाल्यानंतर ते तात्काळ रुग्णवाहिका चालक बबलु मराठे व किशोर लोहार यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. तातडीने जखमीस पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोतीलाल कोल (वय – ३८) रा. वार्ड क्रं. ३ रमपुरी, उमरिया, मध्यप्रदेश अशी जखमीची ओळख पटली. मोतीलाल कोल यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र १९ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मोतीलाल कोल यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अपघाताची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास चाळीसगावचे पी. एस. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल मधुसूदन भावसार हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.