ताडोबातील प्रसिद्ध वाघिणीचा मृत्यू, सापडले कुजलेले अवयव

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सेलिब्रिटी वाघीण मायाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापन अधिकारी आणि दीडशे कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या शोध मोहिमेत एका वाघाचे कुजलेले अवयव सापडले आहे.

मानवी हस्तक्षेप नसलेल्या ताडोबा वनक्षेत्रातील ताडोबा बीटात ८२ क्रमांकाच्या कक्षात हे अवयव मिळाले आहे. १ ऑक्टोबर २०२३ पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हिवाळी पर्यटनासाठी पुन्हा एकदा खुला झाल्यानंतर माया वाघीण दर्शन देत नसल्याचे वनविभाग व पर्यटकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती.
तेव्हापासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात माया वाघिणीच्या शोधासाठी वनविभागाने शोध मोहीम राबविली होती. ताज्या सापडलेल्या अवयवांची माया वाघिणीच्या डीएनएशी केली जाणार आहे. या महिन्याच्या अंतापर्यंत माया वाघिणीच्या मृत्यूबाबत स्पष्टपणे खुलासा होण्याची शक्यता आहे.

माया होती प्रमुख आकर्षण
एकूण १३ वर्षे आयुष्य लाभलेली माया वाघीण पर्यटकांना सहज दर्शन देत या प्रकल्पाचे आकर्षण होती. लीला आणि हिलटॉप टायगर हे तिचे आईवडील होते. २०१४ पासून ती पाच वेळा गर्भवती होती. तिने १३ बछड्यांना जन्म दिला, मात्र विविध कारणांनी यातील केवळ ४ वयस्क होऊ शकली. २०१४ पासून ताडोबातील प्रत्येक वन्यजीव गणनेत माया प्रामुख्याने दिसत राहिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.