स्वयंपाक केला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात घातला रॉड

0

रावेर ;– स्वयंपाक केला नाही या रागातून पत्नीला मारहाण करून शिवीगाळ करीत तिच्या डोक्यात लोखंडी रॉड डोक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ७ रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या दरम्यान घडली असून याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा डंकाहल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे

. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , रावेर शहरातील महात्मा फुले चौकातील कोष्टी वाडा येथे आरोपी नंदकिशोर रघुनाथ चौधरी याने ७ रोजी सकाळी पावनने दहा वाजेच्या सुमारास पत्नी मनीषा नंदकिशोर चौधरी हिला स्वयंपाक केला नाही याकारणावरून चापट मारून लोखंडी रोडने डोक्यात दोन ते तीन वेळा मारून भयंकर दुखापत केल्याची घटना घडली . याप्रकरणी गौरव नंदकिशोर चौधरी याने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.