पोलीस शुभम आगोणे खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना अटक

0

चाळीसगाव:;- चाळीसगाव येथे पाटणादेवी रोडवर क्रिकेट खेळावरून क्षुल्लक कारणावरून काही दिवसांपूर्वीच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सौरभ कोळी, आण्णा कोळी, सिद्धांत कोळी,चित्रा मोरे जय मोरे वसंत बच्छाव व अन्य समाजकंटकांनी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या शुभम अनिल आगोणे या तरुणाची निर्घृणपणे हत्या केली होती. या गुन्हेतील सौरभ कोळी,चित्रा मोरे जय मोरे वसंत बच्छाव पृथ्वी कुमावत विष्णू नेवरे या आरोपींना अटक करण्यात आली होती.

या घटनेनंतर गुन्ह्यातील आंनदा उर्फ अण्णा कोळी सिद्धांत कोळी सह काही आरोपी फरार होते,या फरार आरोपी पैकी अमोल सिताराम कोळी राहुल नारायण कोळी या दोन आरोपींना चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी स्काड च्या पथकाने अटक केली.  या गुन्हेतील फरार आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले,

Leave A Reply

Your email address will not be published.