रावेरात मालकांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

0

रावेर :- शहरातील भारती ज्वेलर्स दुकान मालकाच्या त्रासाला कंटाळून ,काम सोडल्याच्या कारणावरून एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाअसून या प्रकरणी  भारती ज्वेलर्सच्या तिन्ही मलकांविरुढ गुन्हा दाखल करण्यात आला आहे . शहरातील कासार गल्लीतील रहिवासी किशोर सैतवाल वय 40 असं मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की किशोर हा  शहरातील भारती ज्वेलर्स मध्ये काम करत होता. त्याने या ज्वेलर्स मधून काम सोडले होते. या कारणावरून भारती ज्वेलर्सचे मालक करण गणवाणी ,अनुराग गणवानी आणि महेश गनवाणी हे 22 मार्च ते 27 ऑक्टोबर या दरम्यान किशोर याला वेळोवेळी मोबाईलवर तसेच प्रत्यक्ष घरी जाऊन मयताचा भाऊ आई यांच्या मोबाईलवर तसेच काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन आमच्याकडे कामाला परत ये नाहीतर तुझ्यावर चोरीचा आरोप ठेवून समाजात बदनामी करू व तुला कुठेही काम मिळू देणार नाही व किशोर याच्या घराजवळ येऊन मारहाण केली भारतीय ज्वेलर्सच्या तिघा मालकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून किशोर याने घराच्या छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याबाबत मयताची आई त्‍नाबाई बाबुराव शेततळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारती ज्वेलर्सच्या मालकांविरुद्ध रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले ,पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बिजागरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.