नाथाभाऊंसाठी रावेर लोकसभेचा मार्ग मोकळा

0

लोकशाही संपादकीय लेख 

 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रम आता लवकरच घोषित होईल. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या वाटची जागा असल्याने काँग्रेसला ही जागा मिळावी म्हणून आग्रह धरण्यात आला होता. १९९८ पासून रावेर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी स्वतः डॉ. उल्हास पाटलांनी जागा लढवली. तथापि यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीतर्फे जागावाटप राव्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला दिली गेली असती. तथापि आता काँग्रेसने डॉ. उल्हास पाटलांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केले असल्याने तसेच डॉक्टर उल्हास पाटील आणि त्यांची कन्या डॉ. केतकी पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याने किंबहुना एक दोन दिवसात ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असल्याने जळगाव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची दयनीय अवस्था झालेली दिसून येत आहे. रावेर लोकसभेसाठी आता काँग्रेसकडे सक्षम उमेदवारच नाही. त्यामुळे ही जागा आता आपसूकच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाईल आणि राष्ट्रवादीकडे ही जागा गेली तर माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांची यांचा रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. त्या मेळावा रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे असतील असे त्यांनी जाहीर केले होते. तेव्हापासूनच एकनाथ खडसे यांनी पक्षातर्फे उमेदवारी मिळाली तर आपण रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, असे वेळोवेळी जाहीर केले होते. परंतु जागावाटप जागा वाटपात ही जागा कोणाच्या वाटेला जाते त्यानंतरच याचा निर्णय होईल, असे एकनाथ खडसे यांचे म्हणणे होते. त्यामुळे आता त्यांच्या वाटत असलेले काँग्रेस पक्षाचा अडसर डॉ. उल्हास पाटील यांच्या काँग्रेस पक्षातील हकालपट्टीमुळे दूर झाला आहे. भाजपला टक्कर देणारा सक्षम उमेदवार घ्यायचा असेल तर एकनाथ खडसे हे महाविकास आघाडीसाठी सक्षम उमेदवार असतील तेवढे मात्र निश्चित. कारण गेल्या ३०-३५ वर्षापासून एकनाथ खडसे यांचे रावेर लोकसभा मतदारसंघात चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत.

चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जामनेर तसेच विदर्भातील मलकापूर आणि नांदूर या तालुक्यांमध्ये एकनाथ खडसे यांचे संबंध व कार्य चांगले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी रावेर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे हे योग्य उमेदवार असू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात रावेरची जागा आता काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादीला देणे फायद्याचेच राहील. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे नाथाभाऊंची कन्या अवघ्या २२०० मतांनी पराभूत झाली होटी. तसेच तिला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता आणि रोहिणी खडसेला पराभूत करण्यासाठी भाजपची अध्यक्षशक्ती कारणीभूत आहे, असे सर्वश्रुत आहे. आता रोहिणी खडसे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे तिच्या पक्षाचा आणि महिला संघटनेचा नाथाभाऊंना निवडणुकीसाठी चांगलीच मदत होऊ शकते.

राष्ट्रवादीतर्फे रावेर मतदार संघासाठी एकनाथ खडसे उमेदवार असतील तर त्यांचे विरोधात भाजपचे उमेदवार कोण असेल? विद्यमान खासदार रक्षा खडसे या रावेरमधून दोन वेळा विजयी झाल्या असल्या तरी नाथाभाऊंच्या सुनबाई असल्याने रक्षा खडसेना २०२४ च्या निवडणुकीत उमेदवारी मिळणार नाही. त्यांचा पत्ता कापला जाईल, असे बोलले जात आहे. यदा कदाचित खासदार रक्षा खडसेंना भाजपची उमेदवारी मिळाली, तर सासरे आणि सुनेत रावेर लोकसभेची निवडणूक रंगू शकते. यामध्ये सासरे एकनाथ खडसे यांच्याकडून बाजी मारली जाण्याची शक्यता असल्याने रक्षा खडसेंना उमेदवारी देण्याचा धोका भाजपतर्फे पत्करला जाणार नाही. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या विरोधात भाजप सक्षम व तितक्याच ताकदीचा उमेदवार देऊ शकतो. त्यासाठी ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा रावेर लोकसभेसाठी विचार होऊ शकतो.

ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन हे भाजपचे संकट मोचक म्हणून ओळखले जातात. एकनाथ खडसेंना टक्कर देणारा प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून गिरीश महाजन यांना भाजप तर्फे उमेदवारी दिली जाऊ शकते. भाजपचे वरिष्ठ पातळीवर गिरीश महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जाते. स्वतः गिरीश महाजन यांनी रावेर लोकसभा लढण्याची इच्छा नसल्याचे जाहीर केले असले तरी पक्षातर्फे जो आदेश दिला जाईल त्याचे पालन केले जाईल, असे गिरीश महाजन यांनी वेळोवेळी जाहीर केले आहे. त्यामुळे दोन ताकदवान कट्टर प्रतिस्पर्धी जर रावेर लोकसभा मतदारसंघात आमने-सामने आले तरी ही निवडणूक महाराष्ट्रातच नव्हे तर देशाचे लक्ष वेधून घेईल. पाहूया काय होते, ते लवकरच कळेल…!

Leave A Reply

Your email address will not be published.