मोठी बातमी ! रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांचे राजीनामे !

0

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी भाजपने जाहिर केलेली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, महिला प्रदेश उपाध्यक्षा डाॅ. केतकी पाटील  यांच्या नावाची चर्चा मतदार संघात मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे खासदार रक्षा खडसेंचे तिकिट कापले जाणार असल्याचे सुतोवाच बरेच पदाधिकारी करत होते. परंतु दुसऱ्या  टप्प्यात भाजपने जाहिर केलेल्या यादीत खासदार रक्षा खडसेंचे नाव जाहिर झाल्याने पदाधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

बोदवड तालुक्यातील पदाधिकारी हे खासदार खडसेंवर नाराज आहेत. पक्षाने खडसे परिवार सोडून उमेदवारी द्यावी अशी भावना व्यक्त करत  25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे पाठवण्यात आले आहेत.

शहरचिटणीस  पंकज चांदुरकर, बुथ प्रमुख महेंद्र पाटील, युवा शहराध्यक्ष राहुल माळी, ओबीसी तालुकाध्यक्ष आकाश महाजन, बुथ प्रमुख विश्वास जवरे, बुथ प्रमुख वैभव माटे, शहर सरचिटणीस प्रभाकर पाटील , बुथ प्रमुख अभिषेक जैन, सुपर वारीयर मधुकर पारधी, जिल्हा चिटणीस परमेश्वर टिकारे, जिल्हा उपाध्यक्ष राम अहुजा, राहुल सोनवणे, बुथ प्रमुख सचिन जैस्वाल, तालुका सरचिटणीस पंकज डिके, तालुका उपाध्यक्ष संदिप माळी, बुथ प्रमुख अजबराव पाटील, कार्यालय प्रमुख अमोल शिरपूरकर, बुथ प्रमुख अमोल देशमुख,  शहर कोषाध्यक्ष सागर गंगातीरे, शहर संपर्क उमेश गुरव, चिटणीस शिव राजपुत, सचिव अक्षय गंगातीरे, चिटणीस विशाल तांगडे, युवा शहर उपाध्यक्ष अस्लम शेख, चिटनिस सौरव शर्मा या पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.