विश्वगामी पत्रकार संघाच्या महिला तालुका प्रमुख पदी भाग्यश्री शर्मा यांची निवड….!

0

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

सविस्तर वृत्त असे कि, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची जळगाव जिल्हा बैठक दि.१९/११/२०२३ रोजी रावेर येथे संपन्न झाली. त्यावेळी संघटन वाढीवर चर्चा व विचार विनिमय तसेच स्थानिक पत्रकार यांच्या समस्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी मिटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाग्यश्री ईश्वर शर्मा यांची राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या महिला रावेर तालुका प्रमुख पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शाकीर शेख, जिल्हा सचिव राहुल जैन, जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष ईश्वर शर्मा, रावेर तालुका अध्यक्ष संतोष पाटील, रावेर तालुका उपाध्यक्ष ईश्वर महाजन, रावेर तालुका सचिव अतुल विंचूरकर, रावेर तालुका संघटक फिरोज तडवी, मुक्ताईनगर तालुका संघटक किरण पाटील, राजेंद्र देशमुख इत्यादी पत्रकार उपस्थित होते. नवनियुक्त महिला तालुका प्रमुख भाग्यश्री शर्मा यांचे निवडीचे सर्वांकडून पुष्पगुच्छ देत अभिनंदन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.