‘धूम’च्या दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

हिंदी मनोरंजन विश्वातून दुर्दैवी बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय गढवी यांचे निधन झाले आहे. रविवार १९ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी या जागचा निरोप घेतला. संजय गढवी यांच्या निधनाने हिंदी सिने जगतावर शोककळा पसरली आहे.

‘धूम आणि ‘धूम२’ या सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक संजय गढवी यांचं निधन झालं आहे. संजय गढवी हे सकाळी लोखंडवाला बॅकरोड येथे फिरायला जात असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते घामाने भिजले. यानंतर संजय गढवी यांना तातडीने जवळच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी संजय गढवी यांना मृत घोषित केले.

दिग्दर्शक संजय गवढी यांचे पार्थिव सध्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात आहे. १९ नोव्हेंबरच्या रात्री उशिरापर्यंत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.