मालेगावच्या चित्रपट गृहात फटाके फोडणाऱ्या ३ जणांना अटक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

टायगर ३ सिनेमा सुरु असताना काही इस्मानी फटाके फोडल्याचा प्रकार नाशिकच्या मालेगाव मधील मोहन चित्रपटगृहात घडला होता. या प्रकरणी छावणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

दिवाळीच्या दिवशी सलमान खानचा टायगर-३ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. मालेगावच्या मोहन चित्रपट गृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या दर्शनावेळी अभिनेता सलमान खानचे पडद्यावर आगमन होताच चाहत्यांनी गोंधळ घालत फटाक्यांची आतषबाजी केली. अचानक फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरून पळापळ झाली.

पोलिसांना बोलाविण्यात आले होते. यानंतर सालमानच्या चाहत्यांचा गोंधळ थांबला. यानंतर चित्रपटगृह मालकाने त्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यातील तीन आरोपीना छावणी पोलिसांनी अटक केली असून आज त्या आरोपीना तपास व चौकशी कामी मोहन चित्रपट गृहात नेण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.