जळगावात भररस्त्यात पतीची पत्नीला मारहाण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

पती-पत्नीत भांडण हे होतंच असतात. पण, हे भांडण कुठे आणि कधी होईल हे सांगता येत नाही. याचा प्रत्यय चक्क जळगाव शहरातील एका कापड दुकानावर आला. शहरातील एका कापड दुकानावर लग्नाच्या बस्त्यासाठी नातेवाईकांसोबत आलेल्या पती-पत्नीमध्ये घरगुती वाद सुरु झाले आणि पतीने पत्नीला तू घरी ये, तुला पाहतोच असे म्हणत रस्त्यावरच मारहाण करायला सुरुवात केली. ही घटना शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ दि. १८ नोव्हेंबर शनिवार रोजी घडली.

सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील किनगाव येथील पती-पत्नी हे नातेवाइकांकडे असलेल्या लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी आले होते. पती मद्यपान करून आल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावेळी पतीने शिवीगाळ करीत पत्नीला मारहाण केली. नातेवाइकांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांमध्ये बराच वेळ वादविवाद सुरूच राहिला. अखेर शहर पोलिस ठाण्यात पत्नीने पतीविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून पतीविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यावेळी पतीने पत्नीसह नातेवाइकांनीदेखील मारहाण केल्याचा आरोप केला आहे. बस्ता ज्या दुकानात घ्यायला गेले तेथे न घेता दुसऱ्या दुकानातून घेऊ, असे मी सांगत होतो, त्यावरून मला मारहाण करण्यात आल्याचे महिलेकडून सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.