केळी उत्पादकांना बसतोय अस्मानी – सुलतानी फटका

0

चिनावल;- सद्यस्थितीत रावेर यावल मुक्ताईनगर, चोपडा या केळी पट़यात तसेच संपूर्ण जिल्हाभरात एप्रिल मध्येच सूर्य आग ओकू लागल्याने केळी पट्यातील केळी बागांवर ह्या एप्रिल हिट चा परिणाम तर होतच आहे मात्र दुसरीकडे ऐन केळी कापणी च्या हंगामात व्यापारी बोर्डावरील भावापेक्षा कमी भावाने मागणी करीत असल्याने केळी उत्पादकांवर एकी कडे प्रचंड वाढलेले तापमान तर दुसरीकडे केळी मालाची कमी भावाने होणारी मागणी या मुळे उत्पादकांना अस्मानी – सुलतानी अशा दुहेरी सकंटाना सामोरे जावे लागत आहे

केळी हे नाशवंत फळ आहे ते केळी बागेत अथवा स्टोरेज मध्ये जास्त काळ ठेवू शकत नाही अशातच केळी पट़यात ऐन मोठ्या प्रमाणावर केळी कापणीवर आली असताना एप्रिल च्या मध्यावधी तच सूर्य आग ओकू लागला आहे परिसरात आजच 41 ते 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत असल्याने काही काही भागात अति उष्णतेमुळे केळी मान टाकत असल्याने या मुळे केळी उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे केळी वाचवण्यासाठी उत्पादक हर तर्हचे प्रयत्न करीतच आहे आज रोजी या केळी बागां मध्ये जो माल तयार आहे तो व्यापारी नी कापून घ्यावा या साठी उत्पादक प्रयत्नशील आहे अशातच या मजबूरी चा फायदा व्यापारी उचलत असून स्टँडर्ड मालाला ही कमी भावाने मागणी करीत आहे किमान बोर्डावरील तरी भाव मिळाल्यास हाताला हात लागेल ही उत्पादकांची अपेक्षा असताना ऐन हंगामात मालाला मागणी असूनही कमी भावाने मागणी करीत असल्याने उत्पादकांना नुकसानीत जावे लागत आहे

एकीकडे एप्रिल हिट चा तडाखा दुसरीकडे भावाचा मार या मुळे केळी उत्पादक रडकुडीस आले आहे एकरी 1 लाख रूपये खर्च करणार्‍या केळी उत्पादकांची कमी भावाच्या मागणीत मोठी घट सोसावी लागत आहे वर्षभर राब राब राबून महागड्या बेणे, ठिंबक सिंचन, ईले बिल, मोठ्या प्रमाणात वाढलेल्या रासायनिक व जैविक खताच्या किंमती आतरमशागत चा मोठा खर्च अशा लाखो रुपये खर्च करून निर्यातक्षम व दर्जेदार केळी उत्पादित करूनही पाहीजे तशा भावात व्यापारी माल खरेदी करीत नसल्याने उत्पादक यंदा ही कर्जाच्या खाईत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे
केळी ला शासन व शासनाच्या पणन विभाग हमी भाव देवू शकत नसला तरी किमान आपल्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीत काढण्यात येणारा म्हणजेच बोर्डावरील भाव तरी उत्पादकांना मिळवून द्यावा अशी अपेक्षा केळी पट़यात उत्पादक करीत आहे लायसन्स धारक व्यापारी ची बैठक घेऊन या बाबत योग्य ती तजवीज करावी अशीही मागणी केळी पट़यात होत आहे एकंदरीत आज रोजी मात्र दररोज वाढणारे तापमान व बोर्डावरील भावा पेक्षा कमी भावाने केळी ला होणारी मागणी या दुहेरी सकंटात केळी उत्पादक सापडला आहे

 

Leave A Reply

Your email address will not be published.