एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे ज्येष्ठ नागरीक एकाकी – प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे

0

जळगाव ;- एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे कुटुंबातील हरवत चाललेल्या संवादातील घरातील ज्येष्ठ नागरीक एकाकी होत आहेत. अशा ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यता दूत मदत करून विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करतील आशा आशावाद प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी व्यक्त केला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी प्रा. इंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर कुलसचिव डॉ. विनोद पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भूलविभाग प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण, संचालक डॉ. आशुतोष पाटील उपस्थित होते.

प्रा. इंगळे म्हणाले की, तरूण पिढी बाहेर नोकरीला असल्यामुळे आई-वडिल घरात एकाकी आहेत. अशा ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्या नागरिकांना मदत करण्यासाठी सहाय्यता दूत तयार केले जात आहेत. यापुर्वी कोरोना काळात या सहाय्यता दूतांना ज्येष्ठांना मोलाची मदत केली आताही या प्रशिक्षणातून १०० दूत तयार होतील आणि ते ज्येष्ठांची मदत करतील. कुलसचिव डॉ. विनोद पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, विद्यापीठाकडून सामाजिक बांधिलकीचे उपक्रम सातत्याने राबविले जातात. केवळ शिक्षण देणे एवढाच विद्यापीठाचा हेतू नसून त्या पलिकडचे उपक्रम विद्यापीठाकडून घेतले जातात. त्यामुळे या प्रशिक्षणातून तरूण पिढी ज्येष्ठांच्या मदतीसाठी तयार होत आहे ही आनंदाची बाब आहे.

प्रास्ताविकात विभागाचे संचालक प्रा. आशुतोष पाटील यांनी या प्रशिक्षणाचा उद्देश सांगितला. पाच दिवसांच्या या प्रशिक्षणातून १०० सहाय्यता दूत तयार केले जाणार आहेत. जे तीनही जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांना सहाकार्य करतील. या प्रशिक्षणात १५ साधन व्यक्तींना निमंत्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले. या उद्घाटन समारंभाचे सुत्र संचालन सुभाष पवार यांनी केले. त्यानंतरच्या सत्रात डॉ. विवेक काटदरे, डॉ.सौ. व्ही.व्ही. निफाडकर, डॉ. वीणा महाजन यांनी मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.