रावेर : तालुक्यातील मोरगाव येथील शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील मोरगाव येथील भगवान मरू महाजन (वय ६०) हे रविवारी सकाळी शेतात गेले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची शोध घेऊन ही ते मिळाले नव्हते. त्यामुळे रावेर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, आज सकाळी मोरगाव शिवारातील कपाशीच्या शेतात ते मृतावस्थेत आढळून आले. येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माळी यांनी त्यांचे शवविच्छेदन केले. याबाबत राजेंद्र महाजन यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. भगवान महाजन यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे पोलीस उपनिरिक्षक तुषार पाटील यांनी सांगितले.