विकासाचा सेतू बांधणार विजयाची पताका !

खासदार रक्षा खडसे यांचा विश्वास : शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य

0

जळगाव / मुक्तार्इनगर ;- गेल्या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान नद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात झालेल्या विविध विकास कामांच्या माध्यमातून विजयश्री मिळेल असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार तथा खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केला. दै. लोकशाहीने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले.

पंतप्रधान नद्र मोदी यांच्या संकल्पनेतील उज्जव भारत घडविला जात असून ग्रामीण भागापर्यंत विकासाची गंगा पोहचली आहे. गेल्या दहा वर्षांच्या कालखंडात जिल्ह्याचा देखील मोठ्या प्रमाणावर विकास साधला गेला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यात आलेल्या आहे. दळणवळणाच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण करुन उद्योग-व्यवसायाला चालना दिली गेली आहे. महिला सबलीकरणाच्या दृष्टीकोनातून महिला बचत गटाची चळवळ निर्माण करण्यात यश आले आहे. सिंचन, वीज, शेतकरी, मजूर, तरुण यांना डोळ्यासमोर ठेवून विकास साध्य करण्यावर काम करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या दैनंदिन समस्या सोडविण्यावर आगामी काळात मोठे काम करावे लागणार असून त्यावर आपला भर राहणार असल्याचे श्रीमती खडसे यांना सांगितले. रावेर लोकसभा मततदारसंघातील अंकेलश्वर-बऱ्हाणपूर हा राष्ट्राय महामार्ग निर्माण होत असून त्यामाध्यमातून उद्योग व्यवसायाला चालना देण्यात येणार आहे.

…म्हणून नाही केळीला फळाचा दर्जा
केळी हे पिक नाशवंत असून त्याचे वर्षभर उत्पन्न घेता येते. फळाचा दर्जा हा केवळ मोसमी पिकाला मिळत असतो, केळी व द्राक्ष हे मोसमी पिक नसल्यामुळे त्याला फळाचा दर्जा देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र केळीसाठी पिकविमा असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असतो. बऱ्हाणपूर मार्केटमध्ये केळीला चांगला भाव असून त्या ठिकाणी काही तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला माल घेवून जाण्यास अडचणी निर्माण होत असतात, दळणवळणाची सुविधा उत्तम प्रकारे नसल्यामुळे ते शक्य होत नव्हते मात्र आगामी काळात राष्ट्रीय महामार्गामुळे ते शक्य होणार असून शेतकऱ्यांना आपला माल घेवून जाता येणार आहे.

कार्यकर्ताच आहे मुळ घटक
पक्षाचा कणा हा कार्यकर्ता असून त्याच्या मेहनतीमुळेच पक्षाला विजय संपादन करता येतो, कार्यकर्त्यांची फळी भारतीय जनता पक्षात उत्तम प्रकारे असल्याने भाजपाचा विजय शक्य आहे. तम-मन-धनाने कार्य करणारे कार्यकर्ते भाजपमध्ये असल्याने भाजपचा विजय कुणीही रोखू शकत नाही. विकासाचे राजकारण हेच भाजपचे उद्दीष्टे असल्याने कार्यकर्ता निस्वार्थ सेवा करीत असतो, कार्यकर्ताच पक्षाचा मुळ घटका असल्याचेही श्रीमती रक्षा खडसे यांनी सांगितले.

घटकपक्षाचे मोठे सहकार्य
पंतप्रधान नद्र मोदी यांच्या कार्यावर विश्वास ठेवून भाजपला साथ देणाऱ्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी यासह अन्य घटक पक्षांचे भाजपला उत्तम सहाकार्य मिळत असून त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचारात सहभाग घेतला आहे. महायुतीचा विजय हेच कार्यकर्त्यांचे मिशन आहे.

महाजन-खडसेंनी नेतृत्व करावे!
जिल्ह्याचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी मंत्री गिरीश महाजन व ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी नेतृत्व करावे यासाठी आपला प्रयत्न आहे. एकनाथराव खडसे भाजपमध्ये आले तर हे शक्य आहे. महाजन-खडसेंनी एकत्र यावे ही आपली मनापासून इच्छा असून ती लवकरच पूर्ण होर्इल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रनिर्माणासाठी निवडणूक
अठराव्या लोकसभेची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाची, नेत्याची नसून केवळ राष्ट्रनिनर्माणाची निवडणूक आहे. जगात भारतीची मान अभिमानाने उंचावी यासाठी नद्र मोदी प्रयत्न करीत असून त्यांना बळ देण्यासाठी ही निवडणूक होत असून त्यात भाजप व मित्रपक्षाला मोठे यश प्राप्त होर्इल असा विश्वासही खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.