नेत्यांनो विचार करा !

0

मन कि बात : दीपक कुलकर्णी

हाताच्या दहा बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या …. हाती महागडा मोबार्इल…. भव्य दिव्य कार….डोळे दिपवणारे कपडे…. कार्यकर्त्यांचा सदैव राहणार राबता असेच भारतीय पुढाऱ्याचे वर्णन करावे लागणार आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांना ‘राजा’ संबोधून गणतीत घेणे आता शक्य होत नसल्याचे सिद्ध होत आहे. कारणही तसेच आहे.

विदर्भात झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानात मतदारांनी ‘दाना’चा हात आखडता घेतला असून नेत्यांसाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे. नेहमी जनतेला गुलामगिरीसारखी वागणूक देणाऱ्या पुढाऱ्यांनी ही एक चपराकच मानली जात आहे. मतदाराना टक्का वाढावा यासाठी झालेले किंवा होवू घातलेले प्रयत्न फळाला येत नसल्याचे कटूसत्य यातून समोर आले आहे. एकंदरीत काय तर आता पुढाऱ्यांनाच विचार करण्याची वेळ येवून ठेपली आहे. परवा विदर्भातील नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 75 टक्के मतदान होऊ शकले नाही.

रामटेकच्या तुलनेत नागपुरमध्ये कमी मतदान झाले, याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाचा निरुत्साह, वाढते तापमान आदी कारणे सांगून स्थानिक नेत्यांनी मोदींच्या प्रश्नांतून आपली सुटका करुन घेतली असली तरी ती धोक्याची घंटा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पंतप्रधान मोदींना जेव्हा पदाधिकाऱ्यांना भेटले तेव्हा त्यांनी नागपूरमध्ये मतदानाचा टक्का कमी का, असा प्रश्न विचारला. त्यावेळी तापमान 41 अंश सेल्सिअस होते. प्रचंड ऊन व उकाड्यामुळे बरेच मतदार घराबाहेर पडले नाहीत, असे गोलमाल उत्तर देण्यात आल्याने तेही काही वेळ व्यथित झाले होते. “मतदार याद्यांमधील प्रचंड घोळ, मतदारांची नावे गहाळ होणे असले प्रकार आपल्या यंत्रणेकडून सातत्याने होत असतात. प्रशासकीय यंत्रणा कितीही हायटेक झाली असली तरी त्यांना अद्यापही हा घोळ मिटविण्यात यश आलेले नाही.

नागपूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा लढत आहे. त्या ठिकाणी फक्त 54 टक्के मतदान झाले. भाजप आणि प्रशासनाने 75 मतदानाचे उद्दिष्ट ठेवले होते. पण नेहमी प्रमाणेच सरासरी मतदान झाले. मतदान जागृतीसाठी प्रशासनाने मोहीम राबवली होती. पण त्यांचा फारसा फायदा झालेला दिसत नाही. मतदानात वाढ झाली नाही. विदर्भातील बहुतांश प्रश्न अद्यापही कायम आहेत. त्यातच शेतकऱ्यांचा प्रश्न तर कळीचा मुद्दा ठरला आहे. येथे हमीभावाची बोंब असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी मतदानाला न जाण्याचा सामूहिक निर्णयच घेतलेला दिसतो. महिलांचाही निउत्साहात होताच! एकंदरीत काय तर जनतेला नेहमी ग्राह्य धरणे प्रशासन आणि पुढाऱ्यांसाठी त्रासदायक झाले आहे. सालाबादाप्रमाणे शक्यतो निवडणुका ह्या उन्हाळ्यातच येत असतात तशा त्या यावेळीही आल्यात त्यात उन्हाचा बावू करण्याचा प्रश्न नाही. खरा प्रश्न हा जनतेच्या विकासासाठी काय केले हा आहे. एकप्रकारे कमी मतदानाची कमी टक्केवारी ही जनतेची नाराजी असू शकते. असा अद्याप एक टप्पा पार पडला आहे अजून दिल्ली दूर आहे पाहू काय होते ते! पण नेत्यांनो विचार करा!

Leave A Reply

Your email address will not be published.