रावेर यावल विधानसभा मतदार संघात आ. बच्चू कडू यांच्यामार्फत निधी

यावल शहर विकासाच्या मार्गावर

0

यावल (रणजीत भालेराव), लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

रावेर यावल विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या नाकावर टिचून विकास कामांच्या माध्यमातून यावल शहर व ग्रामीण भागासाठी प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुख तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी ६ कोटी ५० लाख रुपयाचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत मंजूर करून विविध कामे जाहीर केल्याने रावेर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुका लक्षात घेता प्रहार जनशक्ती पक्षासाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.

सन २०१९ मध्ये रावेर विधानसभा मतदारसंघ पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तथा आमदार शिरीषदादा चौधरी यांनी ७७  हजार मतदान घेऊन विजय प्राप्त केला होता आणि आहे. या निवडणुकीत भाजपाला ६१ हजार तर अपक्ष उमेदवार अनिलभाऊ छबीलदास चौधरी यांना ४४ हजार ८८६ मते मिळाली आहेत.

अनिलभाऊ चौधरी यांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ४४ हजार ८८६  मतदान घेतल्याने मात्र रावेर विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरण बदलले आहे. यामुळे आता आगामी रावेर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांना आप-आपल्या राजकीय पक्षाच्या ध्येय व दृष्टिकोनातून आपले राजकीय डावपेचाची आखणी करावी लागणार आहे आणि त्याची समय सूचकता बाळगून प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिलभाऊ छबीलदास चौधरी यांनी आमदार बच्चू कडू  यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर विधानसभा मतदारसंघात यावल शहर व ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून शुभारंभ केला. यामुळे संपूर्ण मतदारसंघात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

अनिलभाऊ चौधरी यांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी ६ नोव्हेंबर २०२३  रोजी  संबंधित अधिकाऱ्यांना रावेर विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करीत असल्याचे आदेश काढल्याने यावल शहर व ग्रामीण भागात लवकरच विकास कामे सुरू होतील.

यावल शहरात प्रामुख्याने मंजूर झालेले कामे 

१) यावल न.पा.हद्दीतील तारकेश्वर मंदीरातील लागून संरक्षण भिंत बांधणे साठी ८० लाख

(२) यावल न.पा. हद्दीत बोरावल गेट व भुसावळ नाका येथे रस्ता डांबरीकरण करणे व काँक्रीट डीव्हायडरचे बांधकाम करणे १ कोटी

(३) यावल न.पा. हद्दीतील श्री.व्यासनगर, पांडुरंग सराफ नगर व स्वामीसमर्थ नगरमध्ये विविध ठिकाणी रस्ते मजबुती करण डांबरी करण करणे१  कोटी

(४) यावल न. पा. हद्दीतील आयशानगर, प्रभुलिलानगर, स्वामी नारायण नगरमध्ये विविध ठिकाणी रस्ते खडीकरण, डांबरीकरण व काँक्रीटी गटारी बांधणे १ कोटी ७० लाख

(५) यावल न.पा. हद्दीतील श्री.गजानन मंदिर परिसर,बाबा नगर,ईकरा नगर, रजानगर इत्यादी भागांत रस्ते डांबरी करण व काँग्रीट गटारी बांधणे १ कोटी

(६)  यावल न. पा. हद्दीतील गट नं. ७०९ , ७१० व  ७१२ मध्ये रस्ते, खडीकरण,डांबरीकरण व साईड गटारी बांधणे. ५० लाख

(७)  यावल न. पा. हद्दीतील डांगपुरा कब्रस्थानला संरक्षण भिंत बांधणेसाठी ५० लाख असा एकुण ६ कोटी ५० लाख रुपयाचा निधी यावल शहरासाठी आणि ग्रामीण भागात वेगवेगळ्या कामासाठी वेगळा कोट्यावधी रुपयाचा निधी वेगळा मंजूर केला आहे.

रावेर विधानसभा मतदार संघात विवरा,  मुंजलवाडी, भोकरी, कुसुंबा, वडगाव, पूनखेडा, सावखेडा, वाघोडा, अहिरवाडी रिधूरी इत्यादी ग्रामीण भागात कोट्यावधी रुपयाची कामे केली आणि होणार आहेत.

रावेर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुका आणि अनिलभाऊ चौधरी यांचा वाढता जनसंपर्क आणि लोकप्रियता लक्षात घेता प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी निधी मंजूर करून आणल्याने रावेर विधानसभा मतदारसंघात मात्र राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

विरोधी गटाचे आमदार असल्याने विपरीत परिणाम ?

राज्यात सरकारचे कामकाज कसे चालले हे सर्वांना ज्ञात आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एकमेव आमदार शिरीषदादा चौधरी आहेत.  यांना गेल्या 40 ते 50 वर्षाचा राजकीय वारसा आहे.  लोकप्रियता टिकून असली तरी ते गेल्या वर्षभरापासून आपल्या मतदारसंघातील अनेकांच्या संपर्कात राहत नसल्याने आणि ठराविकच भागात  गटाला प्राधान्य देत असल्याने तसेच प्रसिद्धीपासून लांब राहण्याची भूमिका असल्याने आणि येत्या आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी,आणि मतदारसंघात आमदार बच्चू कडू यांच्या मार्फत अनिल चौधरी यांचा वाढता जनसंपर्क व प्रभाव आणि इतर काही राजकीय पक्षाच्या व अपक्ष भावी उमेदवारांच्या हालचाली लक्षात घेता आमदार शिरीष दादा चौधरी यांची निश्चित अशी भावी राजकीय वाटचाल दिसून येत नाही. त्यामागील नेमके कारण काय ? त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही का ? किंवा विरोधी गटात असल्याने त्यांनी तटस्थ भूमिका ठेवली आहे का ? विरोधी गटात असल्याने त्यांना विधानसभेतून निधी जाणून बुजून दिला जात नाही का ? लोकसभा विधानसभा निवडणुकीत राजकारणात त्यांची महत्त्वाची भूमिका काय राहणार ? त्यांचे सुपुत्र यांना राजकारणामध्ये उतरणार आहेत का ? इत्यादी अनेक प्रश्न सुद्धा संपूर्ण रावेर लोकसभा व विधानसभा मतदारसंघात उपस्थित केले जात आहेत. मा. आमदार शिरीष दादा चौधरी यांचा तळागाळातील ग्रामस्थांशी संपर्क नसल्यामुळे व ग्रामस्थांचे काही काम होत नसल्यामुळे प्रसारमाध्यमापासून दूर राहण्याचा निश्चय केलेला दिसून येतो का ? असे अनेक प्रश्न असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.