गावाच्या विकास कामांना सहकार्य करणार : संदिप सोनवणे

0

मनवेल ता.यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

येथून जवळच असलेल्या शिरागड – पथराडे या गावातील विकास कामांना गती द्यावी व सरपंचसह ग्रामपंचायत सदस्य यांना काही अडचणी आल्यास सहकार्य  करेल असे आवाहन लोकनियुक्त सरपंच व सदस्यांच्या सत्कार प्रंसगी संदिपभैय्या सोनवणे यांनी बोलतांना सांगितले. लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत  सदस्यांचा सत्कार संदिपभैय्या  सोनवणे मित्र परीवार मार्फत ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आला.

शिरागड – पथराडे गृप ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच योगिताताई सोनवणे, सदस्य प्रतापदादा सोनवणे, निलेश सोळंके, आशा सोळंके, रवींद्र सोळंके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पो.पा.सुधाकर सोळंके, भिका सोळंके, महारु सोळंके, योगराज सोळंके, सुधाकर कोळी, जितेंद्र कोळी उपस्थित होते.

नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांना यावल तालुका सरपंच संघटनेच्या माध्यमातून गावातील विकास कामे करताना येणाऱ्या समस्या व मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त निधी  कसा मिळवता येईल याकरीता सहकार्य मिळेल असे सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा वढोदा सरपंच संदिपभैय्या सोनवणे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.