रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत गैरप्रकार रोखले जावे. यासाठी महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीस खरगोन येथील अप्पर पोलीस अधीक्षक बसवेंद्रसिंह बघेला, फैजपूर प्रांताधिकारी देवयानी यादव, पोलीस उपविभागीय अधिकारी भिकनगाव राकेश आर्य, भिकन गाव प्रांताधिकारी बी.एस कलेश, प्रांताधिकारी खरगोन हिरालाल पटेल, सागर निवडणूक, अधिकारी सिरवेलचे जयदीप शर्मा, फैजपूर भगवानपुरा तहसीलदार संजय चव्हाण, सावंत चव्हाण चैनपुर, पोलीस निरीक्षक नातू सिंह रंधा, खरगोन गोपनीय विभागाचे पोलीस अधिकारी सुखदेव मुलावाडी, दिवान सिंह नरगावे, वनपरिक्षेत्र अधिकारी पियुष चौधरी, दारूबंदी विभागाचे शिवम चौरसिया, आयकर विभागाच्या भारती नासरे, सार्थक वर्मा, सुजित कपाटे, राजेंद्र मौर्य, सचिन भास्करे, जयसिंह ठाकूर, वीरेंद्रसिंह धाकड, अभिषेक त्रिवदी, मोहनमाला नाझिरकर, रावेर तहसीलदार बंडू कापसे, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पल्लवी पुराणिक, रामलाल पगारिया यांच्यासह संबंधित सर्व पदाधिकारी उपस्थित होते.