तांदलवाडी येथील श्रव्य पाटील याला सुवर्णपदक

0

खिर्डी (ता.रावेर):;- तालुक्यातील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीअम स्कूल सावदा येथे रंगोत्सव सेलिब्रेशन सन २०२२ -२३ यांच्यातर्फे राष्ट्रीय स्तरावरील नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण, हस्ताक्षर, चित्रकला आणि कार्टुन बनविणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीअम स्कूल येथील विद्यार्थी श्रव्य प्रशांत पाटील( इयत्ता २री) (रा. तांदलवाडी) याने चित्रकला स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक प्राप्त केल्यामुळे परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तालुक्यातील खिर्डी बु॥ येथील अ. भा. पाटील विद्यालयातील शिक्षक प्रशांत जगन्नाथ पाटील यांचा मुलगा आहे. त्याला कलाशिक्षिका कांचन चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल वर्गशिक्षिका श्रद्धा जैन, मुख्याध्यापिका भारती पाटील व सर्व शिक्षकांकडून कौतुक करण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.