जामनेरात महास्वच्छता अभियानास नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

जामनेर ;– जामनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरात महा स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून नागरिक सुद्धा सहभागी होत मोठा प्रतिसाद देत आहेत. दि. ५ जानेवारी ते २२ जानेवारी पर्यंत सकाळी १० वाजे पासून ते ११ वाजे पर्यंत (एक तास) श्रमदान अंतर्गत महा स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. .

मुख्याधिकारी तथा प्रशासक चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातुन निघणाऱ्या कचर्‍याची विल्हेवाट लावणे गटारांची स्वच्छता राखणे याकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात येत आहे. मुख्य रस्त्यावर दिसुन येणाऱ्या म्हणजेच नागरीकांकडुन उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून आगळी वेगळी संकल्पना राबविणार आहे.

तसेच शहरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेला कचरापेटी लावली जात आहेत. शहरात स्वच्छते संदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी व व्याप्ती वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत आहेत. स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारने सुरू केलेले राष्ट्रीय स्तरावरील अभियान असुन त्याचा उद्देश रस्ते व रस्ते पायाभूत स्वच्छता ठेवणे तसेच कचर्‍याची विल्हेवाट लावुन स्वच्छ ठेवणे हे आहे.

आपल्या प्रभागातील या स्वच्छता अभियान श्रमदानात व लोकचळवळीत नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन जामनेर नगरपरिषदेच्या वतीने केले जात आहे.

त्या अनुषंगाने जामनेर नगरीच्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी शहरातील जामनेर पुरा भागातील महास्वच्छता अभियानात सहभागी होऊन स्वच्छता मोहीम राबविली व उपस्थित नागरीकांनी योग्य मार्गदर्शन केले. तसेच या” स्वच्छ भारत अभियान” या क्रांतीत व लोकचळवळीत नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन” आपले शहर सुंदर शहर” बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे. महास्वच्छता अभियाना प्रसंगी माजी नगरसेवक बाबुराव अण्णा हिवराळे कैलास नरवाडे सुनिल कलाल कैलास पालवे समाधान राजुरकर आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे शहरात महा स्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी रविकांत डांगे, नोडल अधिकारी सुरज पाटील, स्वच्छता निरीक्षक विजय सपकाळे, गजानन माळी यांच्या सह आदी कर्मचारी परीश्रम घेत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.