चंद्रावर बर्फच बर्फ ; इस्रोची माहिती

0

बंगळुरू :  भारतीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात चंद्रावरील पाण्याच्या शोधाशी संबंधित नवीन तथ्य समोर आले आहे.चंद्राच्या ध्रुवीय विवरांमध्ये पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त पाण्याचा बर्फ असू शकतो, अशी आशा निर्माण झाली आहे. यासंदर्भात इस्रोने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, आयएसपीआरएस जर्नल ऑफ फोटोग्रामेट्री आणि रिमोट सेन्सिंगमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, चंद्राच्या पृष्ठभागाच्या काही मीटर खाली बर्फाचे प्रमाण पृष्ठभागाच्या तुलनेत पाच ते आठ पट जास्त आहे. हा पृष्ठभागाखाली दडलेला बर्फ चंद्रावर दीर्घकालीन मानवी उपस्थितीसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

इस्रो स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (एसएसी) चे टी. चक्रवर्ती म्हणाले, या बर्फाच्या वितरणाची आणि खोलीची अचूक माहिती भविष्यात चंद्राच्या बाष्पयुक्त पदार्थासह अस्थिरतेचा शोध घेण्यासाठी आणि नमुना घेण्यासाठी लैंडिंग साइट्स निवडण्यात महत्त्वपूर्ण ठरेल.

नासाच्या लुनार रीकोनिसन्स ऑर्बिटर (एलआरओ) वर असलेल्या सात उपकरणांच्या डेटाचे विश्लेषण करताना, संशोधकांच्या पथकांना आढळले की, उत्तर ध्रुवीय प्रदेशात दक्षिण ध्रुवापेक्षा दुप्पट बर्फ आहे. प्राचीन चंद्र ज्वालामुखी दरम्यान सोडलेल्या वायूपासून बर्फाची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते. भारताच्या चांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेतील रडारचा डेटा वापरून काढलेले निष्कर्ष असे सूचित करतात की, काही ध्रुवीय विवरांमध्ये बर्फ जमा होऊ शकतो. इस्रोने म्हटले आहे की, नवीन अभ्यास चंद्राच्या बाष्पयुक्त पदार्थाच्या इन-सीटू तपासणीसाठी भविष्यातील योजनांना पाठबळ देणारा आहे. पाणी हे मानवी जीवनासाठी एक मौल्यवान स्रोत आहे. अशा परिस्थितीत, चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी खाली बर्फाचे अस्तित्व एक नवीन शक्यता निर्माण करणारे आहे. जगभरातील शास्त्रज्ञ वर्षानुवर्ष चंद्रावरील पाण्याचा शोध घेत असून याबाबत विविध प्रकारची माहितीही समोर येत असल्याने त्यांच्या शोधकार्यालाही या संशोधनामुळे बळमिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.