७५ हजार वर्षांपूर्वीच्या महिलेचा चेहरा जगासमोर उघड

0

बगदाद : – सुमारे ७५,हजार वर्षांपूर्वी इराकमधील बगदादच्या उत्तरेला ५०० मैल उत्तरेस एका डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गुहेत एका मध्यमवयीन निएंडरथल महिलेला दफन करण्यात आले होते. आता पुरातत्त्व शास्त्रज्ञांमुळे तिचा चेहरा पहिल्यांदाच जगासमोर येऊ शकला. ‘शैनिडार झेड’ असे या सांगाड्याचे नाव असून २०१८ मध्ये पहिल्यांदा हा सांगाडा उघडकीस आला. तत्पूर्वी हजारो वर्षे तो गाळात गाडला गेला होता. केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आणि लिव्हरपूलच्या संशोधकांनी तिची कवटी शोधून काढली, तेव्हा ती सुमारे २ सेंमी जाडीची होती. मृत्यूनंतर लगेचच ती दरड कोसळून चिरडली गेली होती. कवटी मूळ आकारात आणण्यासाठी २०० हून अधिक तुकडे एकत्र करण्यात आले.

आता नेटफ्लिक्सच्या ‘सीक्रेट्स ऑफ द निएंडरथल’ नावाच्या डॉक्युमेंटरीचा भाग म्हणून तिचा चेहरा पुन्हा तयार करण्यात आला आहे. केम्ब्रिजच्या पुरातत्त्व विभागाच्या पुरामानवशास्त्रज्ञ डॉ. एम्मा पोमेरॉय म्हणाल्या, ‘निअँडरथल आणि माणसांच्या कवट्या खूप वेगळ्या दिसतात. निअँडरथल मनुष्याच्या भुवया मोठ्या असतात आणि त्यांना हनुवटी नव्हती. ठळक नाक होते. आजही जिवंत असलेल्या जवळजवळ प्रत्येकाकडे निअँडरथल डीएनए आहे. दातांचा वापर तिच्या वयाचा अंदाज लावण्यासाठी देखील केला जात होता. तिचे समोरचे काही दात मुळापर्यंत खराब झाले होते. तिची उंची सुमारे पाच फूट उंच होती.’ सांगाडा काढण्यासाठी पथकाने सर्वप्रथम हाडे आणि आजूबाजूचा गाळ बळकट करण्यासाठी गोंदसदृश कंसॉलिडेंटचा वापर केला.

मग त्यांनी गुहेच्या मध्यभागी असलेली साडेसात मीटर माती आणि खडकाखालून डझनभर छोट्या फॉइल-गुंडाळलेल्या ब्लॉक्समध्ये शैनिडार झेडला बाहेर काढले. केम्ब्रिज प्रयोगशाळेत, संशोधकांनी गोंद हळूहळू पातळ करण्यापूर्वी आणि हाडांचे तुकडे काढण्यास स्कॅनचा वापर केल्या. त्यापूर्वी प्रत्येक ब्लॉकचे मायक्रो-सीटी स्कॅन घेतले. डॉ. पोमेरॉय म्हणाले, ‘कवटीचा प्रत्येक तुकडा हळुवारपणे स्वच्छ केला जातो, तर हाड स्थिर करण्यासाठी गोंद आणि कंसॉलिडंट पुन्हा जोडले जाते, जे चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखे अतिशय मऊ असू शकते. हे एखाद्या हाय स्टेक थ्री डी जिगसॉ कोड्यासारखे आहे. एका तुकड्यावर प्रक्रिया करण्यासाठी पंधरवड्याहून अधिक कालावधी लागू शकतो. शैनिडार झेड सापडल्यानंतर पुढील संशोधनात जवळच्या मातीत जळालेल्या अन्नाचे सूक्ष्म अंश आढळले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.