मुक्ताईनगर ;– वडोदा वनक्षेत्रातील मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्र सातपुड्याच्या पायथ्याशी शुक्रवारी रात्री ३ वाजेच्या सुमारास वन विभागाने लावलेल्या कृत्रिम पाणवठ्यावर पट्टेदार वाघ कैद झाला आहे
पाणी पिऊन जात असताना पट्टेदार वाघाची छायाचित्रे वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली. यामुळे गेल्या दोन वर्षानंतर पट्टेदार वाघाचे पुन्हा दर्शन घडल्यामुळे वन्यप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
वनक्षेत्रात एकूण ५ पट्टेदार वाघ असल्याचे सांगण्यात येत आहे. यात दोन मादी आणि दोन शेव (बछडा) व १ नर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मे महिना चालू असल्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यामुळे वन विभागाकडून कृत्रिम पाणवठे भरून ठेवले आहेत. वन्य प्राण्यास जंगलात पाणी उपलब्ध करून देण्यास वनक्षेत्रपाल परिमल साळुंखे व वन कर्मचारी प्रयत्न करत आहे. दरम्यान, बुद्ध पौर्णिमेच्या अगोदरच पट्टेदार वाघाची दर्शन झाल्यामुळे वन्यप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे.